बांदा (प्रतिनिधी)*
बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी बांदा ओटवणे रोडवर राज्य उत्पादन शुल्क इन्सुली पथकाच्या टीमने दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून १० लाखाच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई आज सकाळी करण्यात आली. धोंडीराम गायकवाड व विशाल पठारे अशी
अशी त्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून बोलेरो पिकप जप्त करण्यात आला आहे.
