कुडाळ प्रतिनिधी
तालुक्यातील नेरूर देसाई वाडा येथील श्री.देव मल्हार मंदिरात दरवर्षी प्रमाणे यावर्षी विजयादशमी दसऱ्याचे औचित्य साधून रविवार दिनांक १३ ऑक्टोंबर २०२४ रोजी मल्हार मंदिर येथे विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दुपारी ४ वाजता सत्यनारायण पूजा, सायं ६ वाजता भजन, सायं ७ वाजता ढोल ताशांच्या गजरात देवीचा गोंधळ आणि रात्रौ ठीक ८:३० वाजता लोकराजा सुधीर कलिंगण प्रस्तुत श्री. कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरूर यांचा दणदणीत नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन, मल्हार मित्रमंडळ व मल्हार ढोल ताशा पथक नेरूर देसाई वाडा यांनी केले आहे.