विशाल परब यांना धोका नक्की कोणापासून? पोलीस संरक्षण दिल्याने चर्चांना उधाण…
नेमकं सावंतवाडीचे राजकारण कुठे चालले?रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यानंतर बदललेले राजकारण…
सावंतवाडी प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांना पोलीस संरक्षण देण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने नुकताच घेतला आहे. विशाल परब यांच्यासारख्या कोणत्याच आक्रमक किंवा राडेबाजीच्या राजकारणात नसणाऱ्या शांत संयमी युवा नेतृत्वाला नेमका कोणापासून धोका आहे? त्यांना तातडीने पोलीस संरक्षण देण्याची आवश्यकता प्रशासनाला का वाटली असावी? कुठे चालले आहे सावंतवाडीचे राजकारण? कोण आहेत ज्यांच्यापासून विशाल परब यांच्या जीवीताला धोका आहे याबाबत पोलिसांकडे योग्य तो अहवाल असेलच. पण विशाल परब यांना पोलीस प्रशासनाने पुरवलेल्या संरक्षणानंतर जनमानसात मात्र चर्चांमधून अनेक प्रश्नचिन्हे उमटू लागली आहेत.
♦️महात्मा गांधींनी सावंतवाडी संस्थानाला रामराज्य असे म्हटले होते. सावंतवाडीकर जनता ही शांतताप्रिय आणि लोकशाहीची बूज राखून आपले रोजचे व्यवहार करणारी जनता आहे. राजकारणातला दहशतवाद, दादागिरी किंवा राडेबाजी अशा प्रकारांना ही जनता कधीही थारा देत नाही. राजकारणाचा विचार केला तर दीपक केसरकर यांच्यासारखा आमदार शांतताप्रिय व्यक्तिमत्व ही छबी प्रस्थापित करून मागील तीन टर्म आमदार पदावर आहे.
पण या वेळचे बदललेले राजकारण सावंतवाडी मतदारसंघातील जनतेलाही अस्वस्थ करत आहे.
♦️यातूनच विशाल परबही सर्व ताकद वापरून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत, त्यांना कोण रोखणार? ते निवडणूकीला उभे राहिलेत तर कोणाचा फायदा होणार?कोणाचे नुकसान होणार? याचीही गणिते मांडली जात आहे.विशाल परब यांच्या सहा रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यानंणर बदलेले राजकारण, एकमेकांचे राजकीय जिवन उध्दवस्त करण्यासाठी चाललेली धडपड यातूनच हा संघर्ष उफाळून आला असावा असे बोलले जात आहे.