मंत्री दीपक केसरकर:मात्र या विधानसभेला वैभव नाईक यांचा पराभव निश्चित
सावंतवाडी प्रतिनिधी
काही लोक आता वाटेल तसे स्टेटमेंट करू लागले आहेत. मी त्यावेळी मदत केली म्हणून वैभव नाईक हे दोन वेळा निवडून आले मात्र आता त्यांचा पराभव हा निश्चित आहे. असा दावा मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केला. दरम्यान येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मी स्वतः राणेंच्या चिरंजीवांच्या प्रचारासाठी दोन्ही मतदार संघात फिरणार असल्याचे देखील केसरकर यांनी यावेळी स्पष्ट केले. ते आंबोली येथे पत्रकारांशी बोलत होते.
