निलेश राणे यांचा उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कुडाळात शिवसेनेत प्रवेश..
पक्षातील सर्वच नेत्यांची जिवाभावाचे संबंध,निवडणूक जिंकणे हेच टार्गेट..!
कुडाळ प्रतिनिधी
महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार कुडाळ
विधानसभा मतदार संघ शिवसेनेला गेला आहे. हा मतदार संघ गेल्या दहा वर्षात विकासात मागे गेला आहे. त्यामुळे आपण हा बॅकलॉग भरून काढतानाच एकविसाव्या शतकातील विकसित मतदार संघ करण्यासाठी आपण शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता कुडाळ हायस्कूलच्या पटांगणावर भव्य सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती शिवसेनेत प्रवेश करणार आहे, अशी माहिती निलेश राणे यांनी सांगितले.
याबाबत माहिती देण्यासाठी राणे यांनी कुडाळ येथील महालक्ष्मी सभागृहात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी विनायक राणे, राकेश कांदे, पप्या टवटे आदी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना राणे यांनी, २०१९ ला आपण वडील खा नारायण राणे यांच्या समवेत भाजप पक्षामध्ये प्रवेश केला. या पक्षात खूप आदर मिळाला. सर्व नेत्यांनी प्रेम, आदर दिला. पक्ष शिस्त शिकता आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लहान भावाप्रमाणे सांभाळले, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनीही भावाप्रमाणे सांभाळले. सर्वच नेत्यांनी सांभाळले. आपले या पक्षातील सर्वच नेत्यांशी जीवाभावाचे सबंध आहेत. यापुढेही राहतील.
मी पक्ष शिस्त मानणारा आहे. प्रोटोकॉल पाळणारा आहे. आतापर्यंत वडील नारायण राणे यांच्या म्हणण्यानुसार वागत गेलो. परंतु महायुतीच्या वाटाघाटी नुसार काम करावे लागते. लोकसभेत २७ हजार मतांचे लीड मिळाले. जिल्हा बँक, सर्व खरेदी विक्री संघ, सहकारी संस्था भाजपच्या ताब्यात घेतल्या. ९० टक्के ग्रामपंचायती भाजपकडे आणल्या. परंतु मी घेतलेला निर्णय नेत्यांनी ठरविलेला आहे. मला एका गोष्टीचे समाधान वाटते, ते म्हणजे वडील नारायण राणे यांची सुरुवात ज्या चिन्ह, पक्षावर झाली. त्याच पक्ष, चीन्हात काम करण्याची संधी मिळाली आहे.
भाजप मधील सबंध होते तसे पुढेही राहतील. निवडणूक जिंकणे हेच टार्गेट आहे. शिस्त पाळत आपण राजकारण जिंकणे हेच टार्गट आहे. शिस्त पाळत आपण राजकारण करीत असतो. आदेश पाळणार कार्यकर्ता आहे. पक्ष हितासाठी हा निर्णय घेतलेला आहे. बाळासाहेब हे आमचे कायम दैवत राहणार. माझी स्पर्धा आमदार विरोधात नाही. मी त्यांच्यावर टीकाही करणार नाही. परंतु आपला मतदार संघ महाराष्ट्रात टॉप पाच मध्ये राहण्यासाठी माझा प्रयत्न नाही. गेल्या दहा वर्षात मतदार संघ मागे गेला आहे. हा मतदार संघ एकविसाव्या शतकातील मतदार संघ वाटला पाहिजे. उद्या पक्ष प्रवेशवेळी माझ्यावर असलेल्या प्रेमापोटी यायचे ते येणार. कुडाळ मध्ये आतापर्यंत झाला नाही एवढा मोठा कार्यक्रम येथे होणार आहे, असे निलेश राणे यांनी सांगितले.