साावंतवाडी (प्रतिनिधी)*
सामंत ट्रस्ट मुंबई यांच्या माध्यमातून आणि सावंतवाडीतील डॉ. जयेंद्र परुळेकर यांच्या पुढाकारातून तालुक्यातील ७ गरजू लोकांना आर्थिक मदत करण्यात आली. यात दुर्धर आजाराने पिडीत तसेच शैक्षणिक मदत म्हणून ही मदत देण्यात आली आहे. दरम्यान ज्या गरजू लोकांना मदतीची गरज आहे त्यांनी आपले प्रस्ताव आमच्याकडे सादर करावेत, असे आवाहन यावेळी डॉ. परुळेकर यांनी केले. यावेळी संघमित्रा कांबळे, विजया गावडे, साहिल गावडे, शांती शेडगे, हरीश्चंद्र पवार, सुषमा मुळ्ये, सखाराम सावंत आदींना प्रत्येकी १० हजाराची मदत देण्यात आली.