वेंगुर्ला (प्रतिनिधी)
आज सकाळी पासून अपक्ष उमेदवार सौ अर्चना घारे परब यांनी त्यांच्या प्रचाराची सुरुवात आपल्या रेडी गावा पासून सर्व देव देवतांचे आशिर्वाद घेऊन प्रचाराची सुरुवात करण्यात आली.
यावेळी रेडी , शिरोडा , आरवली , आसोली , मोचेमाड , उभादांडा येथील सर्व ग्रामस्थ मंडळी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच यावेळी अर्चना घारे परब यांच्या समवेत श्री.योगेश कुबल , दीपिका राणे , विक्रांत कांबळी , विशाल बागायतकर , सुहास मोचेमाडकर , आदिती चुडजी , कुणाल बिडीये , वनिता मांजरेकर , रिया धुरी , गजानन नारासूले , तेजस तांडेल , आबा गवंडे , शुभम नाईक , प्रशांत वेंगुर्लेकर , सुनिता भाईप , प्रशांत बागायतकर, विनायक परब , मयुरी भाईप , अलीशा गोठसकर , विवेक गवस आदी प्रचारास गावातील सर्व ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहून विजयाचा विश्वास व्यक्त करत अर्चना घारे परब यांना शुभेछा दिल्या.