विशाल परब यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षातर्फे छत्र्यांचे वाटप

सावंतवाडी (प्रतिनिधी)
भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांनी सावंतवाडीतील जवळपास 200 व्यापाऱ्यांना छत्र्यांचे वाटप केले.कालच कोकणचे भाग्यविधाते नारायणराव राणे साहेब यांचा दणदणीत विजय झाला, त्या विजयाप्रित्यर्थ जल्लोश म्हणून या छत्र्या वाटण्यात आल्या. याबद्दल व्यापारी बंधू-भगिनींनी विशाल परब यांचे आभार मानले.

उन्हाळा, पावसाळा या ऋतूंमध्ये व्यापारी भाजीपाला तसेच इतर सुविधा आपल्याला उपलब्ध करून देत असतात. त्यांच्या संरक्षणासाठी एक मायेचे छत्र म्हणून युवा उद्योजक विशाल परब यांच्या माध्यमातून छत्रीचे वाटप करण्यात आले. या छत्र्यांवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री तथा नवनिर्वाचित खासदार नारायणराव राणे, जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि विशाल परब यांचा उल्लेख आहे.

सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला या तीन तालुक्यातील भाजीपाला व्यापारी तसेच रस्त्यावर हात विक्री करणाऱ्या सर्व विक्रेत्यांना तब्बल 5000 छत्र्यांचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी दिली. त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

छत्री वाटप कार्यक्रम प्रसंगी माजी नगरसेवक राजू बेग, आनंद नेवगी, मनोज नाईक, सुधीर आरवडेकर, उत्कर्षताई रासोलकर, भाजपा सरचिटणीस विनोद सावंत, केतन आजगावकर, अमित गवंडकर, अमित परब, गणेश कुडव, सागर मठकर, शक्ति केंद्रप्रमुख बंटी जामदार, मंदार पिळवणकर, अजय सावंत आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page