कणकवली (प्रतिनिधी)
निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कणकवली यांनी काल रात्री केलेल्या कारवाईत 1 लाख 20 हजार रुपयांच्या दारूसह 6 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत केली कारवाई.
MH – 07 – 2186 या महिंद्रा झायलो (चारचाकी वाहन) वाहनाने दारू वाहतूक होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क यांना मिळताच त्यांनी काल रात्री सदर गाडीचा पाठलाग करून कारवाई केली यामध्ये आरोपी हा फरार झालेला असून या एकूण कारवाईत महिंद्रा झायलो किंमत रू. 5,50,000/- गोवा बनावटीच्या गोल्डन एस व्हीस्की चे 750 मिली क्षमतेच्या 60 बाटल्या (5 बॉक्स) रॉयल क्वीन व्हीस्की चे 750 मिली क्षमतेच्या 180 बाटल्या (15 बॉक्स)
मद्याची किंमत रु.1,20,000/- असा एकुण 6 लाख 70 हजार
रुपयांचा मुद्देमाला हस्तगत करण्यात आला आहे.
