EVM व VVPAT मशीन सिलींगचे होणार कामकाज…
कुडाळ (प्रतिनिधी)
कुडाळ तहसील कार्यालयात दिनांक 11 आणि 12 नोव्हेंबर दिवशी सकाळी 7 वाजल्यापासन सायंकाळपर्यंत विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्रावर वापरण्यात येणारे EVM व VVPAT मशीन मतदानासाठी तयार करणे व सिलींग करण्याचे कामकाज करण्यात येणार आहे. या कालावधीत वरील नमुद ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवणेत येणार असून, सदर ठिकाणी उमेदवार, उमेदवार निवडणूक प्रतिनिधी तसेच उक्त कामकाजासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांचे व्यतिरीक्त अन्य व्यक्तीस प्रवेश देण्यात येणार नाही. असे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांनी कळविले आहे.
भारत निवडणूक आयोग, दिल्ली यांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला आहे. 269 कुडाळ विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक प्रक्रियेनुसार दिनांक 11.11.2024 ते दिनांक 12.11.2024 या कालावधीत सकाळी 07.00 पासून ते सायंकाळपर्यंत तहसीलदार कार्यालय कुडाळ येथील मध्यवर्ती सभा मंडपामध्ये मतदान केंद्रावर वापरण्यात येणारे EVM व VVPAT मशीन मतदानासाठी तयार करणे व सिलींग करणेचे कामकाज करणेत येणार आहे. सदर कालावधीत वरील नमुद ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवणेत येणार असून, सदर ठिकाणी उमेदवार, उमेदवार निवडणूक प्रतिनिधी तसेच उक्त कामकाजासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांचे व्यतिरीक्त अन्य व्यक्तीस प्रवेश देण्यात येणार नाही.
तरी दिनांक 11.11.2024 ते दिनांक 12.11.2024 या दिवशी तहसीलदार
कार्यालय कुडाळ व उपविभागीय अधिकारी कार्यालय कुडाळ येथे
निवडणूक कामकाज व्यतिरीक्त इतर कामकाजासाठी नागरीकांना
प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे सदर कालावधीत उपविभागीय अधिकारी कार्यालय कुडाळ व तहसीलदार कार्यालय कुडाळ येथे काम असल्यास नागरिकांनी संबंधित कार्यालयाकडील कामकाजासाठी येणे शक्यतो टाळून, दि. 13.11.2024 रोजी वा त्या नंतरचे कालावधीत उपस्थित राहून आपले कामकाज करावे. तरी सर्व नागरीकांनी वरील सर्व बाबी लक्षात घेऊन प्रशासनास सहकार्य करण्याचे याद्वारे आवाहन करणेत येत आहे.
