कुडाळ प्रतिनिधी
तालुक्यातील आकेरी गावातील युवकांनी आमदार
वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर व कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून त्यांच्या उपस्थितीत आज ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी श्री. नाईक यांनी त्यांचे शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले..
यावेळी विशाल परब, मनोज माणगावकर, निकिता राणे, प्रतिक राणे, संध्या माणगावकर, अनिकेत सावंत, जयदीप सावंत, हेमंत मेस्त्री, ताता पालव, महेश धुरी, ऋषिकेश धुरी, कृष्णा आकेरकर, सचिन आकेरकर, प्रथमेश आकेरकर, गौरव नाईक, तृप्ती आईर, मनोज सावंत या युवकांनी व युवतींनी प्रवेश केला आहे.
याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य रमाकांत ताम्हणेकर, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, विभागप्रमुख बंड्या कुडतरकर, आकेरी सरपंच महेश जामदार, सुर्या घाडी, कौशल जोशी, शाखाप्रमुख बाळा राणे आदी शिवसैनिक उपस्थित होते.
