गणपतीला शाकाहारी तर गौरीला मांसाहारी जेवणाचा थाट तळकोकणातील प्रथा…

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी)
तळकोकणात गणेशोत्सव अनेक प्रथा -परंपरानी साजरा केला जातो.काल सर्वत्र गौरीचे पूजन करण्यात आले मात्र तळकोकणात काल गौरी आवाहन झाल्यानंतर आज गौरी सजवून पूजन करण्यात आले.गौरीला दाग -दागिने,गजरा घातला जातो मात्र काकड़ीच्या फुलांच्या हारा शिवाय इथे तिचा साज श्रृंगार पूरा होत नाही.तळकोकणात माहेरवासिनीला वडे-सागोती करुन घातली जाते त्यांच पद्धतीने इथे ही गौरीला माहेरवासीन म्हणून संबोधले जाते म्हणून तीला ही वडे-सागोतीचा नैवेद्य दिला जातो.तर काही ठिकाणी शुद्ध शाकाहारी नैवेद्य दिला जातो.कोकणात प्रत्येक घरामागे प्रथा बदललेल्या पहायला मिळतात.मात्र वडे-सागोतीचा नैवेद्य दाखवणाऱ्या गौरीचे अप्रूप निराळेच.रात्री फुगड्या आणि भजन करुन गौरीचा जागर केला जातो.उदया या गौरींचे विसर्जन केले जाते.वडे-सागोतीचा नैवेद्य असलेल्या गौरीचा कसा असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page