जनता आता सावंतवाडीत बदल नक्कीच घडवणार- विशाल परब.
वेंगुर्ला प्रतिनिधी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विशाल परब यांचा प्रचाराचा झंजावात सुरू असून ठिकठिकाणी लोकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. सावंतवाडी मतदारसंघातून आता नक्कीच बदल घडणार असून जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे गोरगरीब जनता आपली सेवा करण्यासाठी एका नवख्या युवा चेहऱ्याला सावंतवाडी विधानसभेतून संधी देणार. दिलेल्या संधीचं या मतदारसंघात नक्कीच सोन करणार असे विशाल परब यांनी बोलताना सांगितले.
आरोंदा आणी सातार्डा पंचक्रोशीत विशाल परब यांनी आपला प्रचार दौऱ्याचा झंजावात सुरू ठेवला असून जनतेतून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.