सासोली जमीन गैरव्यवहार प्रकरणी संदेश पारकर यांच्या आंदोलनाला सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचा पाठिंबा:इर्शाद शेख

दोडामार्ग प्रतिनिधी
येथे काही परप्रांतीय धनदांडग्यांनी तेथील ग्रामस्थांच्या सामाईक जमीनी सरकारी यंत्रणाना हाताशी धरून बळकावल्या आहेत. त्या विरोधात ग्रामस्थांनी आंदोलन केले होते आणि बेकायदेशीर अकृषक सनदा रद्द करण्याची मागणी केली होती परंतू त्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवण्यात आली. ग्रामस्थांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी 24 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता दोडामार्ग तहसील कार्यालय येथे तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. या आंदोलनाला महाविकास आघाडीतील घटकपक्ष म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचा संपूर्ण पाठिंबा आहे असे सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख यांनी सांगीतले. इर्शाद शेख पुढे म्हणाले की सर्व सामान्य नागरीकांना साध्या घर बांधणीसाठी अकृषक दाखला मिळण्यासाठी किती त्रास सहन करावा लागतो परंतू या धनदांडग्यांना झटक्यात बेकायदेशीर अकृषक दाखले सुद्धा मिळतात. तरी सासोली ग्रामस्थांच्या न्याय मागणी नुसार बेकायदेशीर दिलेले अकृषिक सनदा रद्द करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा 24 सप्टेंबर 2024 रोजी होणाऱ्या आंदोलनाला काँग्रेसचा सक्रिय पाठिंबा राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page