सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आज होणाऱ्या दौऱ्यावर कुडाळ नजीक महामार्गावर लागले बॅनर

मुख्यमंत्री उत्तर द्या!” असे झळकले बॅनर

कुडाळ प्रतिनिधी
राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातही राजकीय वातावरण तापल्याचे दिसून येतेय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सावंतवाडीत प्रचारसभा होणार आहे. या दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावरील कुडाळ तालुक्याच्या हद्दीत असलेल्या झाराप गावच्या हद्दीत जोरदार बॅनरबाजी करण्यात आलीय. या बॅनरवर मुख्यमंत्री शिंदे यांना काही प्रश्न विचारण्यात आले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रचारासाठी येणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी उत्तरे द्यावीत, असे या बॅनरवर लिहिलेये…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page