आमदार निलेश राणे यांचा पॉलिटिकल एन्काऊंटर करण्याचा प्रयत्न झाला, भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या म्हणण्यात तथ्य

मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांचा दुजोरा.

गेल्या लोकसभा निवडणुकीत कुडाळ मालवण मतदार संघात मिळालेल्या मताधिक्याच्या तुलनेत विधानसभा निवडणुकी मिळालेले अल्प मताधिक्य याचा विचार करता, भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या म्हणने योग्यच वाटते. लोकसभेच्या नंतर विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुडाळ व मालवण तालुक्यांमध्ये पक्षप्रवेशांचे धडाके लावले गेले ते आभासी पक्षप्रवेश ठरलेत की काय.??
मुळात हि एन्काऊंटर करणारी टिमच कार्यरत होती. आमच्या पदाधिकारी, कार्यकर्त्या कडुन तशा बातम्या पण समजत होत्या. निवडणूक निकालाच्या दुसर्या दिवशी एका पदाधिकार्या सोबत हा विषय पण आम्ही चर्चीला होता. तो आज पण पुरावा म्हणून आहे. पण आता चिंदरकरांच्या जाहीर प्रेस मुळे याला दुजोरा द्यावासा वाटला.
2019 ला फुल फ्लेश काम करणारी मंडळी 2024 या वेळेस डिम होती., प्रचार यंत्रणेत अंग राखून होती, काही विशिष्टां करवी व्हाट्सअँपवर विरोधी मोहीम राबवली जात होती, बाजुच्या जिल्ह्याच्या प्रचार यंत्रणा तेथील उमेदवार हे महत्वाचे वाटत होते. अशा पण सर्व चर्चा ऐकु येत होत्या. भविष्यात हि जागा रिकामी राहील्यास आपल्या , आपल्या माणसाचा नंबर इथे लागु शकेल अस पण काही मंडळीच मत होत. योग्य उमेदवारालाच मतदान करा हा !! अशी फोना फोनी केल्याच्या घटणा सुद्धा समजत होत्या .
एकंदरीत समर्थकांच्या मनामधे चलबिचल पणा करुन कोण, कोण संधी शोधतोय ? हे शोधुन काढण हे चिंदरकर यांच्या आरोपांमुळे आता महत्वाच झालाय. राणेंच वलय वापरुन
आता हि टिम आपल्या माणसांन साठी वेगळ लाॅबिग आणि राणे साठी वेगळ लाॅबिग करते.
याचा अभ्यास आता महायुतीतील सर्वानीच करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page