इर्शाद शेख:जाहीरनाम्याबद्दल भाजपच्या नेत्यांकडून बदनामी सुरू
सावंतवाडी प्रतिनिधी
भाजपने दहा वर्षात काहीच केलं नाही. फक्त भुलथापा करून मोठमोठ्या जाहिराती करत जनतेची दिशाभूल करण्याचा काम केल्यामुळे आता काँग्रेसचा जाहीरनामा बघून भाजपची पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे जाहीरनाम्याबद्दल भाजपच्या नेत्यांनी बदनामी सुरू केली आहे, असा आरोप काँग्रेसचे जिल्हध्यक्ष इर्शाद शेख यांनी आज येथे केला.
दरम्यान विनायक राऊत यांनी गेल्या दहा वर्षात समाधानकारक काम केले आहे. त्यामुळे जनता नक्कीच त्यांच्या पाठीशी उभी राहील. मात्र समोरचे उमेदवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांनी जिल्ह्यासाठी काय केलं ? ते आधी त्यांनी सांगावे. मग आमच्या उमेदवारांवर बोलावे, असा टोला देखील यावेळ शेख यांनी हाणला.
यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीप नार्वेकर, तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, शहराध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर, विभावरी सुकी, जासमीन लखमेश्वर, माया चिटणीस, अमिती मिस्त्री, संभाजी सावंत, किरण टेंभुलकर लकर, रूपेश आईर, कौतुभ पेडणेकर, संदीप सुकी, भाट आदी उपस्थित होते