कणकवली प्रतिनिधी
महायुतीचे लोकसभेचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी आघाडी घेतली आहे. त्यांनी कणकवली तालुक्यातील नरडवे येथे जाऊन श्री. राणेंच्या प्रचार केला. यावेळी कोकणच्या विकासासाठी येथील मतदाराने राणेंना जास्तीत जास्त मताधिक्य मिळण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले. यावेळी भाजप चे नरडवे सरपंच गणपत सावंत, भाजप चे माजी कणकवली पंचायत समिती सभापती सुरेश ढवळ, राष्ट्रवादी कणकवली तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, राष्ट्रवादी प्रांतिक सदस्य विलास गावकर, प्रांतिक सदस्य दिलीप वरणे, राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष अमित केतकर, राष्ट्रवादी जिल्हा प्रतिनिधी केदार खोत, जिल्हा सचिव सतीश पाताडे आदी उपस्थित होते.
नारायण राणेंच्या प्रचारात अबिद नाईकांचा झंझावात..
