कुडाळ (प्रतिनिधी)
माणगाव व घावनळे जिल्हा परिषद मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार रुपेश कानडे व दिपक नारकर तसेच पंचायत समिती उमेदवार कौशल जोशी, सिताराम तेली,दिव्यानी खरात, अर्चना घावनळकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ माणगाव ची ग्रामदेवता श्री देवी यक्षिणी व दत्तगुरु महाराज यांना श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी दोन्ही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्यासाठी प्रार्थना केली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत भाजपा जिल्हाप्रमुख प्रभाकर सावंत भाजपा जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई तालुकाप्रमुख दीपक नारकर भाजपा तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर उपस्थित होते.
