नुकसान भरपाई मिळवून देण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आ.वैभव नाईक यांनी सूचना
कणकवली तालुक्यातील हरकूळ गावाला चक्रीवादळ व पावसाचा मोठा फटका बसला आहे. अनेक घरांचे छप्पर उडाले तर अनेक घरांवर झाडे कोसळून नुकसान झाले आहे. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक आणि शिवसेना कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी आज सकाळी हरकूळ गावातील शेखवाडी, खडकवाडी, कांबळीवाडी येथे भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. पंचनाम्यांची माहिती घेतली.
यावेळी आ.वैभव नाईक यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी फोनवर चर्चा करत नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई मिळवून देण्याच्या सूचना दिल्या. तसेच झाडे कोसळल्याने विद्युत पोल आणि वीज वाहिन्या तुटून वीज पुरवठा देखील खंडित झाला आहे.याबाबत आ. वैभव नाईक सतीश सावंत यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून लवकरात लवकर विज पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी हरकूळ सरपंच बंडू ठाकूर, नित्यानंद चिंदरकर, राजू पावसकर, अमेय ठाकूर, हनीफ शेख आदी ग्रामस्थ उपस्थित होते.