व्यापाऱ्यांना आणि स्थानिक विक्रेत्यांना वटपौर्णिमेपर्यंत बसण्याची परवानगी मिळावी अशी मागणी
सावंतवाडी प्रतिनिधी,
सावंतवाडी शहरातील बाजारपेठेत तसेच रस्त्याच्या आजूबाजूस जे विक्रेते भाजीपाला, फळे तसेच अन्य साधन सामग्री विक्रीसाठी बसतात. त्या विक्रेतांना आज सावंतवाडी नगरपालिकेकडून उठून जाण्याचे आदेश होते.
हा प्रश्न घेऊन स्थानिक व्यापाऱ्यांनी आणि सर्वसामान्य विक्रेत्यांनी विशाल परब यांची भेट घेत त्यांना हा विषय सविस्तर सांगितला. यावर तात्काळ विशाल परब यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी साळुंखे यांच्या समवेत चर्चा करून यावर तोडगा काढण्याची विनंती केली.
व्यापाऱ्यांनी आणि स्थानिक विक्रेत्यांनी वटपौर्णिमेपर्यंत आम्हाला याच ठिकाणी बसण्याची परवानगी मिळावी अशी मागणी केली. या मागणीला मुख्याधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत योग्य तो निर्णय घेऊ, असा विश्वास दिला आहे.