कालेली सरपंच सुधाकर पडकील यांचा पुढाकार!
माणगाव दि ११;-
कालेली गावातील शेतकऱ्यांच्या गाई आणि बैलांना लम्पी आजाराची लागण होऊ नये म्हणून कालेली गावचे सरपंच सुधाकर पडकील यांच्या पुढाकाराने आज ७५ जनावरांना लसिकरण करण्यात आले
कालेली गावातील शेतकऱ्यांच्या जनावरांना ही लम्पी लागण होऊ नये म्हणून मा आमदार वैभव नाईक यांच्या पुढाकाराने आज पशुधन पर्यवेक्षक सौ.निकीता तांबे तसचे पर्यवेक्षक दिपक सकपाळ पर्यवेक्षक मनोज वाळके यांनी गावात येऊन गुरांना लसिकरण केले.कालेली गावातील वाड्यांमध्ये फिरुन गुरांना लसीकरण केले यावेळी शेतकऱ्यांनी सरपंच सुधाकर पडकील यांनी पुढाकार घेतला म्हणून समाधान व्यक्त केले
