महसूल मंत्री श्री चंद्रकांत बावनकुळे यांची ग्वाही
सावंतवाडी प्रतिनिधी
आंबोली,चौकूळ व गेळे तील कबूलयतदार जमिनी वरील वन विभागाची नोंद लवकरच रद्द करून सदर जमिनी लवकरच वाटपासाठी उपलब्ध करून देणार.
आंबोली सरपंच यांनी निवेदन देत गावाची सामाजिक परिस्थिती वर्णन केली, व सदर विषय सुमारे 30 वर्षे प्रलंबित राहिल्या मुळे येथील ग्रामस्थ मंडळीना होणारा त्रासा बाबत सविस्तर माहिती दिली.
यावेळी आंबोली सरपंच सौ सावित्री पालेकर,आंबोली प्रमुख गावकर श्री शशिकांत गावडे , आंबोली तंटामुक्ती अध्यक्ष श्री उल्हास गावडे उपस्थित होते तसेच प्रांतधिकारी श्री निकम, तहसीलदार श्री श्रीधर पाटील , सर्कल श्री यादव, तलाठी मुळीक व इतर महसूल अधिकारी, पोलीस प्रशासन अधिकारी उपस्थित होते.
