MRF टायर कंपनीत नोकरीची संधी

कुडाळ येथे मुलाखती;मनसेचे आयोजन..

कुडाळ प्रतिनिधी
भारतातील नामांकित MRF टायर कंपनीमध्ये प्रशिक्षणार्थी( पहिल्या वर्षी) नोकरीची संधी..
गोवा फोंडा येथील MRF युनिट साठी 250 जागांसाठी ही महा भरती होणार आहे. सर्व प्रक्रिया विनामूल्य राहणार आहे. उमेदवार आठवी ते बारावी किंवा आयटीआय शिक्षित असावा ,(काही जागा ग्रॅज्युएट आणि डिप्लोमा साठी वेगळ्या असतील) राहण्याची मोफत सुविधा, कॅन्टीन सुविधा, युनिफॉर्मसह, रुपये 17500 ते 19000 महिना पगार, तसेच भविष्यात कायमस्वरूपी होण्याची संधी ,प्रतिवर्षी पगारात वाढ. अशा विविध सुविधा यात असणार आहेत. ही महाभरती बै. नाथ पै शिक्षण संस्था. एमआयडीसी कुडाळ. येथे दिनांक 12/ 9 /2025 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 2. 30 या वेळेत आयोजित केली आहे. यावेळी कंपनीचे मॅनेजमेंट टीम उपस्थित राहून, तात्काळ जॉब लेटर प्रदान करण्यात येणार आहेत. याचे आयोजन मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्यावतीने केले असून, जास्तीत जास्त सिंधुदुर्गवासी उमेदवारांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन मनसे सिंधुदुर्गच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी या नंबर चौगुले – 9384003305, खांडेकर- 9699290224 वर संपर्क साधावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page