कुडाळ ते कोरजाई बस कायमच उशिराने सुटत असल्याने प्रवाशांचे हाल.!

येत्या दोन दिवसांत ही बस वेळेवर न सुटल्यास कवठी पासुन कुडाळ ला येणा-या बस रोखल्या जातील;उपसरपंच रुतुजा खडपकर

कुडाळ (प्रतिनिधी)
कुडाळ ते कोरजाई ही बस सेवा कित्येक वर्षे सुरू असुन पुरेसे प्रवाशी असलेले ही बस कुडाळ वरुन ६ :४० ला सुटणारी उशिराने सुटत असल्याने येत्या दोन दिवसांत वेळेवर बस न सुटल्यास कवठी येथुन एकही बस कुडाळ येथे येणार नाही असा इशारा कवठी उपसरपंच सौ रुतुजा खडपकर यांच्या सह उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शिवसेनेच्या वतीने कुडाळ आगार व्यवस्थापक रोहीत नाईक यांना देण्यात आला
कुडाळ ते कवठी कोरजाई ही बससेवा ६ :४० ची संध्याकाळी कुडाळ बसस्थानकावरुन सुटण्याची वेळ असताना ही बस कधीही वेळेवर सुटत नसल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत यासाठी आज उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमरसेन सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना तालुका प्रमुख राजन नाईक, कुडाळ तालुका शिवसेना संघटक बबन बोभाटे, नेरुर जि प विभाग उपविभाग प्रमुख मंगेश बांदेकर, उपसरपंच सौ रुतुजा खडपकर, माजी सरपंच रुपेश खडपकर, शाखाप्रमुख राजन खोबरेकर,युवासेनेचे रुपेश खडपकर यांनी आज कुडाळ आगार व्यवस्थापक रोहीत नाईक यांना निवेदन देऊन ही बस सेवा वेळेवर सोडण्यासाठी निवेदन सादर केले आहे
यावेळी उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांनी सांगितले कि कुडाळ आगाराचे वेळापत्रक पुर्णपणे कोलमडले असुन सुरक्षित बस सेवा यापुर्वी दोन वर्षे आधी मिळत होती परंतु सध्या गावागावात जाणा-या काही बसेस बंद करुन प्रवाशांची गैरसोय केलेली आहे या ही बसेस बंद केलेल्या आहेत त्या पुर्ववत सुरू कराव्यात अशी मागणी श्री सावंत यांनी केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page