पारपोली येथे नवीन बसस्टॉपच्या कामाचे भूमिपूजन

सावंतवाडी प्रतिनिधी
पारपोली गावठणवाडी आणि ग्रामपंचायत नजीक लवकरच नवीन बसस्टॉप नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. भाजपचे युवा नेते संदिप गावडे यांच्या हस्ते या नूतन बसस्टॉपच्या कामाचे भूमिपूजन नुकतेच पार पडले. हा बसस्टॉप कै. सुभेदार महादेव भानू परब आणि कै. शहीद सुभेदार अंकुश महादेव तेजम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारण्यात येत आहे.

यावेळी बोलताना संदिप गावडे यांनी सांगितले की, पारपोली गावातील नागरिकांना या बसस्टॉपचा मोठा फायदा होईल, या उद्देशानेच हे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी सोनू गावकर यांचे विशेष सहकार्य लाभले, असेही त्यांनी नमूद केले.

या भूमिपूजन प्रसंगी मनिष परब, बूथ अध्यक्ष एकनाथ परब, शिवराम परब, शंकर परब, अरुण गावकर, अमित परब, दीपक पास्ते, शुभम गावकर, सिद्धिविनायक गुरव, परेश कलांगण, ज्ञानेश्वर तेजम, कार्तिक तेजम, मैथिली परब, शोभा कलांगण, प्रितेश कलांगण, अक्षय गावकर, संकेत परब, सुभाष गावकर, चंद्रकांत गावकर, भानुदास गावकर, गजानन डांगी, सुहास तेजम, रमेश परब, बुधाजी जाधव, बिपीन गावकर, सुभाष राऊळ
आदी मान्यवर उपस्थित होते. या नवीन बसस्टॉपमुळे पारपोली गावातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page