शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर,शिवसेना तालुकाप्रमुख
अरविंद करलकर,शिवसेना तालुकासंघटक रमेश हरमलकर यांनी दहावी S.S.C परीक्षेत विशेष यश संपादन केल्याबद्दल संजय घाटकर यांची मुलगी कु. संजना संजय घाटकर हीने १० वी S.S.C परीक्षेत १००% गुण संपादित केले त्याबद्दल तिचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस खुप खुप मनःपूर्वक भगव्यामय शुभेच्छा दिल्या व आपण असेच यश संपादन करा. व आपले आई वडील व शिक्षक यांचे नावलौकिक वाढवा,गुणवंत व्हा!यशवंत व्हा! कीर्तिवंत व्हा ! व समाजात आपले नावलौकिक वाढवा असे गौरोद्गार यावेळी बोलताना काढले.