१४ व्या वर्धापनदिनानिमित्त ग्रामस्थांशी साधला संवाद
सिंधुदुर्ग प्रतिनिधी
जिल्ह्यातील भाजपचे युवा नेते महाराष्ट्र राज्य विशालजी परब यांनी आज श्री देव गावडेश्वर मंदिराच्या १४ व्या वर्धापनदिनानिमित्त मंदिरात उपस्थित राहून देवाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गावडेश्वर चरणी नतमस्तक होऊन जिल्ह्याच्या सुख-समृद्धीसाठी साकडे घातले.
दर्शनानंतर त्यांनी उपस्थित ग्रामस्थांशी आपुलकीने संवाद साधला आणि त्यांच्या समस्या व गावांमधील विकासकामांबाबत चर्चा केली.
यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
