अभिजीत पानसेः मला फक्त तुम्ही साथ द्या मी सिंधुदुर्गात येऊन राहीन..
सावंतवाडी प्रतिनिधी
पदवीधर आमदार निरंजन डावखरे यांना कोणी पाहिलाय का ते निवडून आल्यापासून कधीही कोकणात पदवीधरांकडे पोहोचलेच नाहीत. मनसेनेने कोकणच्या पदवीधरांसाठी व्हिजन तयार केला आहे मला फक्त तुम्ही साथ द्या मी या सिंधुदुर्गात येऊन तुमच्यात राहीन असे मनसेनेचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अभिजीत पानसे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले