सिद्धेश नाईक (कुडाळ) यांनी तयार केलेल्या शिरवाळा मशीनची अमेरीकेत खरेदी..

कुडाळ प्रतिनिधी
श्री केळबाई ईंडट्रीज कुडाळ येथे मालक श्री सिद्धेश नाईक(कुडाळ – केळबाई वाडी) यांनी तयार केलेले शिरवाळा मशीन अमेरीका येथील श्री मांजरेकर यांनी खरेदी केले,आपल्या कोकण संस्कृतीतील सध्या लोप पावत चाललेले शिरवाळे एकेकाळी आद्य पाहुणचार कुटुंबात त्या जमान्यात असायचा पण हल्ली तरुण पिढीत शिरवाळे म्हणजे काय विचारलं तर ते प्रश्नचिन्हच राहते परंतु हल्ली अशाच बऱ्याच जुन्या संस्कृतीतील आपल्या वस्तूंचे प्रदर्शन सुद्धा अंध कलाकार श्री हरी परब यांनी कुडाळ येथे भरवले होते त्यातच कुडाळ केळबाई वाडी येथील श्री सिद्धेश नाईक यांनी अशाचं अनेक वस्तूंचे निर्माण आपल्या केळबाई इंडिस्ट्री मध्ये करतात यापैकी शिरवाळा बनविण्याचे मशीन त्यांनी बनवले व हे अमेरिकेत सुद्धा त्याला मागणी आली हे विशेष श्री मांजरेकर यांनी अमेरिकेतून खास मागणी केली होती व त्यांना हा शिरवाळा मशीन सुपूर्द करण्यात आली यावरून कोकणात लोप पावत असलेला शिरवाळा पुन्हा चर्चेत आला आहे…. शब्दांकन श्री महेश सावंत (पखवाज अलंकार)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page