मनसेचा इशारा:१५ दिवसांत कारवाई न झाल्यास जनआंदोलन
सावंतवाडी प्रतिनिधी
तालुक्यातील
गावांमध्ये अवैद्य धंदे राजरोसपणे सुरू आहेत. याबाबत वारंवार तक्रार करून देखील अद्याप पर्यंत कोणतीही कारवाई केली गेली नाही. त्यामुळे येत्या १५ दिवसात कारवाई न झाल्यास मनसेच्या वतीने जनआंदोलन केले जाईल व याला सर्वस्वी पोलीस प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा देण्यात आला आहे.
याबाबतचे निवेदन आज पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांना देण्यात आले. यावेळी मनसेचे सावंतवाडी संपर्क अध्यक्ष महेश परब, जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर, अमित नाईक, सावंतवाडी तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत, विधानसभा सचिव गुरुदास गवंडे, परिवहनचे जिल्हाध्यक्ष राजू कासकर, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत, आंबोली विभाग अध्यक्ष काशीराम गावडे आदी उपस्थितीत होते.
त्यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, तालुक्यातील गावांमध्ये गोवा बनावटीची दारू, जुगार, मटका व अमली पदार्थ विक्री राजरोस पणे सुरू आहे. याबाबत वारंवार तक्रार करून सुद्धा अद्याप पर्यंत कोणती कारवाई झाली नाही. याकडे पोलीस प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे येत्या १५ दिवसात कारवाई न झाल्यास मनसेच्या वतीने जनआंदोलन केले जाईल व याला सर्वस्वी पोलीस प्रशासन जबाबदार राहील, असे म्हटले आहे .