गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या:विशाल परब*
सावंतवाडी प्रतिनिधी,
सावंतवाडी प्रतिनिधी
यशवंतराव भोसले सभागृह, म्हादव भाटले येथे सकल मराठा समाज विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास माजी खासदार तथा भाजपा प्रदेश चिटणीस निलेशजी राणे आणि भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. सुवर्ण भारताच्या निर्मितीत आजचे विद्यार्थी पुढे जाऊन हातभार लावणार आहेत. अशा विद्यार्थ्यांमधून सुजाण नागरिक घडवण्याचे महत्त्वाचे कार्य शिक्षक करत असतात. त्यामुळे आपल्या मनात शिक्षक वर्गाविषयी कायमच आदराची भावना असते, असे मत परब यांनी व्यक्त केले. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रसंगी माजी खासदार तथा भाजपा प्रदेश चिटणीस निलेशजी राणे, भाजपा युवामोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशालजी परब, माजी नगराध्यक्ष संजू परब, कोकण लाईव्ह ब्रेकींगचे संपादक तथा सकल मराठा समाज सावंतवाडी तालुकाध्यक्ष सिताराम गावडे, लखमराजे भोसले, माजी नगरसेवक सुधीर आडिवरेकर, बाबू कुडतरकर, विलास जाधव, माजगाव सरपंच अजय सावंत, चराठा उपसरपंच अमित परब, जय भोसले, सुंदर गावडे, उपप्राचार्य भोसले, आदी मान्यवर उपस्थित होते.