सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाची जिल्हा कार्यकारिणी बैठक संपन्न..!

केंद्रीय मंत्रिमंडळात ना श्रीपाद नाईक यांची वर्णी लागली त्याबद्दल अभिनंदन ठराव!

भंडारी समाजाच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा होण्याच्या दृष्टीने प्रत्येक तालुक्याने नियोजन करावे:जिल्हाध्यक्ष रमण वायंगणकर

सिंधुदुर्ग प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाची जिल्हा कार्यकारिणी बैठक नुकतीच सभा कुडाळ येथे नुकतीच जिल्हाध्यक्ष श्री रमण वायंगणकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली
यावेळी केंद्रीय मंत्री मंडळात भंडारी समाजाचे जेष्ठ नेते ना श्रीपाद नाईक यांची पुन्हा केंद्रात मंत्री म्हणून निवड झाल्याने अभिनंदन ठराव संमत करण्यात आला तसेच भंडारी समाजाच्या दहावी, बारावी विद्यार्थी गुणगौरव सोहळा प्रत्येक तालुक्यात घेण्यात यावा तसेच भंडारी समाजाच्या जनगणनेबाबत चर्चा करण्यात आली तसेच सभासद नोंदणी मोठ्या प्रमाणात करण्यात यावी असेही ठरविण्यात आले यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी समाजाचे जेष्ठ नेते मामासाहेब माड्ये, जिल्हाध्यक्ष रमण वायंगणकर, जिल्हा सचिव विकास वैद्य, भंडारी समाजाचे देवगड हेमंत करंगुटकर, भंडारी समाजाचे सदस्य निलेश गोवेकर,माजी जिल्हा अध्यक्ष अतुल बंगे, दोडामार्गचे श्री दीवाकर म्हाळवणकर,भरत आळवे गुरुजी, कणकवली मनोहर पाल्येकर, वेंगुर्ले जयप्रकाश चमणकर, रामदास तेंडुलकर आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page