राष्ट्रीय काँग्रेस कुडाळ तालुकाध्यक्ष अभय शिरसाठ यांची प्रतिक्रिया…
कुडाळ प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पाडण्यामागे विरोधकांचे हात असल्यास सीबीआय,पोलीस यंत्रणा एलसीबी यांचा वापर करून तपास करावा.खरोखरच विरोधकातील कोणत्याही व्यक्तीने हे नीच कृत्य केले असल्यास त्याचा कडेलोट करावा.आमचा त्या कारवाईला पाठिंबा राहील.
विरोधकांना संपवण्यासाठी ज्या प्रकारे सीबीआय,ईडी पोलीस यंत्रणा यांचा वापर केला.
त्यापेक्षा दुपटीने हा तपास करण्यासाठी संबंधित यंत्रणांचा वापर करवा. व यात विरोधक दोषी आढळले नाही. तर प्रशासन व अधिकारी जबाबदार असल्यास अतुल काळसेकर, संबंधित मंत्री व अधिकाऱ्यांचा राजीनामा घेणार का? अभय शिरसाट कुडाळ तालुका काँग्रेस अध्यक्ष यांचा सवाल व्यक्त केला.