मंत्री दिपक केसरकर करणार निवडणूक आयोगाकडे तक्रार..
सावंतवाडी (प्रतिनिधी)
सिंधुदुर्गातील वनसंज्ञा संदर्भात राणेंच्या नावाने बेनामी पत्र काढून महा विकास आघाडीकडून कोणतीही परवानगी न घेता बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या संदर्भात आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याची माहिती मंत्री दिपक केसरकर यांनी आज येथे दिले.
दरम्यान हा प्रश्न केंद्राच्या संबंधित असताना विनायक राऊत यांनी गेल्या 10 वर्षात का सोडू शकले नाही असा सवाल देखील श्री केसरकर यांनी यावेळी उपस्थित केला. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
मंत्री केसरकर म्हणाले, पत्रक काढताना प्रकाशकाच नाव, प्रती छापण्याबाबतचा उल्लेख करावा लागतो. तसेच ते निवडणूक आयोगाकडे देऊन परवानगी घेण गरजेचं असतं. अस असताना सिंधुदुर्गतील वनसंज्ञे संदर्भात नारायण राणेंची बदनामी करणारी निनावी पत्रक वाटली जात आहेत. त्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांचे, उमेदवाराचे फोटो आहेत. त्यामुळे या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचही लक्ष वेधणार आहोत. चुकीचं चित्र जनतेसमोर उभ केल जात आहे. खोटी पत्रक वाटली जात आहेत. वनसंज्ञेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय हा सुप्रिम कोर्टाचा होता. त्या आदेशानुसार भारतात त्याची अंमलबजावणी झाली. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांना प्रतिज्ञापत्रक सादर करण्यास सांगितली होती.
त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सादर झालेल्या ४२ हजार हेक्टर जमीनीला तत्कालीन मंत्री नारायण राणे यांनी तीव्र आक्षेप घेतला होता. वनसंज्ञा लावलेल्या जमीनीबाबत चुकीची माहीती जिल्हाधिकारी यांनी दिली अस पत्रिज्ञापत्र दिलं. त्यासाठी विशेष समिती नेमली गेली. या समितीने अठराशे हेक्टर जमीन वगळता उर्वरीत जमीन वनसंज्ञेतून वगळण्यात यावी असं प्रतिज्ञापत्र सुप्रिमकोर्टात दाखल केलं. हा विषय सुप्रिम कोर्टात आहे. कोर्ट हीअरींग घेत नाही तोवर यावर निर्णय होऊ शकत नाही. हे असताना नारायण राणे यांनीच ही वनसंज्ञा लावलेली आहे असा चुकीचा प्रचार केला जात आहे. हा खोटा प्रचार आहे, यावर कारवाई होईलच. परंतू, आपल्या भाषणात खासदार विनायक राऊत हाच प्रचार करत फिरत आहेत. त्यामुळे ही पत्रक त्यांचीच असल्याचा आमचा आरोप आहे. ते दहा वर्ष या मतदारसंघाचे खासदार होते. केंद्राशी संबंधित हा प्रश्न असताना ते काय करत होते ? विनायक राऊत हे निष्क्रीय खासदार आहेत. खोटा प्रचार करताना दहा वर्षात काय केलं हा सवाल जनतेन त्यांना विचारला पाहिजे. या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारे खासदार मंत्री झाले आहेत.
प्रा. मधू दंडवते, सुरेश प्रभू यांनी ते मंत्रीपद मिळवलं होतं. राज्यसभेचे खासदार असताना देखील
नारायण राणेंना केंद्रीय मंत्री पद मिळाल. कोकणचे प्रतिनीधी असल्यानं मानाचं स्थान त्यांना मिळालं.
