आम्हाला ईडब्ल्यूएसचे आरक्षण द्या :- मराठा महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष ॲड सुहास सावंत यांची मागणी

कुडाळ (प्रतिनिधी)
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्यांना आमचा पाठिंबा राहील. परंतु आमची कागदपत्रे मराठा म्हणून गणना होणार असेल, तर सिंधुदुर्ग- रत्नागिरीतील मराठ्यांना आरक्षणच नको.आम्हाला ईडब्ल्यूएसचे आरक्षण द्यावे अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अॅड सुहास सावंत यांनी पत्रकार परिषदेत कुडाळ येथे केली.

मोठ्या प्रमाणात मराठा समाज हा आता कुणबी होण्याची शक्यता आहे. मात्र सिंधुदुर्ग भागातील मराठ्याच्या कागदोपत्री कुणबी नोंदी मिळत नाहीत. त्यांच्या नोंदी या मराठा म्हणूनच सापडतात. अशा परिस्थितीमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निकाल पत्राच्या आधारे मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, आणि मिळाल आणि ते सरकारन दिल ते फारसे टिकेल यावर आमचा तरी विश्वास नाही. अशा परिस्थितीत सिंधुदुर्ग रत्नागिरीतील मराठ्यांच काय होणार? असा सवाल मराठा महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अॅड सुहास सावंत यांनी उपस्थित करून मराठा समाजामधील लोकांमध्ये प्रबोधन करण्यासाठी लवकरच मेळावा घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

येथील अखिल भारतीय मराठा समाज महासंघाच्यावतीने मराठा

समाज सभागृहात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली

होती. यावेळी शिवाजी घोगळे, अमरसेन सावंत, मुकुंद धुरी, लवू

वारंग, लक्ष्मण पावसकर, शशिकांत चव्हाण, चंदू कदम, लवू

गावडे, हर्षद पालव, श्रीधर गावडे, शैलेश घोगळे उपस्थित होते.

अॅड. सावंत म्हणाले, पुन्हा एकदा मराठा क्रांती मोर्चाचे

वातावरण कुडाळ तालुक्यात निर्माण करण्याचा आमचा हेतू

आहे. आम्हाला नुसता मेळावा घ्यायचा नाही आहे. तर त्या
आहे. आम्हाला नुसता मेळावा घ्यायचा नाही आहे. तर त्या

मेळाव्याच्या माध्यतून लोकांमध्ये प्रबोधन करायच आहे. कारण २०१६ साली मराठा क्रांती मोर्चा काढण्यात आला. त्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. तीन ते साडेतीन लाख लोक त्या मोर्चात सहभागी झाले होते. त्यानंतर दोन वेळा मराठा समाजाला आरक्षण मिळाल. त्यातील पहिलं आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकल नाही. दुसर १५ फेब्रुवारी २०१४ रोजी दिलेल आरक्षण सध्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकलेले आहे. याच पार्श्वभूमीवर विविध मागण्या समाज घटकाच्या तक्त्यावर येतात. संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी गेल्या वर्षभरापासून मराठा समाजाच स्फूर्तीस्थान पेटवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु त्यांच्या आंदोलनाकडे कोकणातील मराठा म्हणून बघायच झालं. तर त्यांनी जी सरसकट कुणबी अशा प्रकारच आरक्षण मिळाव ही भूमिका घेतली. ही भूमिका कायदेशीर रित्या योग्य होती. कारण २०१८ साली न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण नाकारल. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालपत्रामध्ये मराठा समाज हा प्रगत समाज आहे. अशा प्रकारचा निष्कर्ष नोंदवला आहे. त्यामुळे
मराठा अशा प्रकारच्या सगे सोयऱ्यांच नातं निर्माण झाल. सगे सोयरे या शब्दाचा विचार केला तर ज्याची आपण लग्नाची बोलणी करतो. त्यावेळेला आपण सगे असतो. लग्न जुळवणी आपण सोयरे होतो. आपण सोयरे हा शब्द आला आहे. त्या मुलीला आमचा विरोध नाही. अनेक न्याय निवाडे अनेक राज्य मागास आयोग त्यांच्यात मराठा आणि कुणबी एकच आहे. खात्रीने म्हटले आहे की मराठा आणि कुणबी एक समान फरक आहे. गायकवाड काँग्रेसने म्हटले मराठा आणि कुणबी एकच आहे. अनेकांच्या मध्ये एकवाक्यता नाही. मराठा म्हणजे कुणबी आणि कुणबी म्हणजे मराठा या लोकशाही শাসन लोकशाही सुरू करणे. गॅझेटीयरच्या नोंदी आधारे जातीचा लाभ द्यायचा. हैदराबाद गॅझेरची नोंद मराठवाड्यातील मराठी मोठ्या कुणबी समाजात जाणार आहेत. आता गॅझेटीयर सातारा तर पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग कुणबीत जाणार आहे. बॉम्बे प्रेसिडन्सी गँटीयर मध्ये सिंधुदुर्ग-रत्नागिरी हा भाग येत असला तरी ग्रेट बॉम्बे प्रेसिडन्सी एरियामध्ये सिंधुदुर्ग-रत्नागिरीच्या नोंदी आहेत. त्याच्या माऊँझेबॉम्बे प्रेसिडन्स गॅझेटियर, हैदराबाद, किंवा सातारा गँटीयरवर लागू केले. तर त्याचा लाभ सिंधुदुर्ग- रत्नागिरीतील मराठींना होणार नाही. या परिस्थितीमध्ये नेमक सिंधुदुर्ग-रत्नागिरीतील अर्थच काय? असा प्रश्न त्यांनी केला

आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page