कुडाळ-मालवण शिवसेना मनोमिलन मेळाव्याला उस्फुर्त प्रतिसाद..
कुडाळ प्रतिनिधी
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री. रवींद्रजी चव्हाण साहेब,महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्ष तथा सिंधुरत्न समिती संचालक श्री.किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या उपस्थितीत कुडाळ शिवसेना पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी श्री.प्रभाकर सावंत,भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष,मा.श्री.संजय आंग्रे,शिवसेना जिल्हाप्रमुख,श्री.रुपेश पावसकर,शिवसेना जिल्हा संघटक,श्री.भास्कर राणे,शिवसेना खजिनदार श्रीम.वर्षाताई कुडाळ,महिला आघाडी जिल्हाप्रमुख,श्री.बबन शिंदे,शिवसेना कुडाळ मालवण विधानसभा क्षेत्रप्रमुख,श्री.संदेश पटेल,कणकवली विधानसभा क्षेत्रप्रमुख यांच्या उपस्थितीत पार पडली.यावेळी कुडाळ मालवण मधील विभागप्रमुख यांनी विशेष मेहनत घेऊन हा मनोमिलन मेळावा यशस्वी केला.यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधील गैरसमज दूर करण्यात आले.यावेळी शिवसेना पक्षातील उपस्थित पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी श्री.किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या आदेशाचे आपण काटेकोरपणे पालन करणार अशी ग्वाही दिली.