सावंतवाडी येथील पत्रकार परिषदेत शैलेश परब यांचा सवाल..
सावंतवाडी प्रतिनिधी
निलेश राणे यांनी रेडी पोट संदर्भात जे आरोप केलेत ते सिद्ध करून दाखवावे आम्ही स्थानिक लोकांच्या रोजगारा संदर्भात त्या ठिकाणी गेलो होतो. त्यामुळे जर आम्ही त्या ठिकाणी हप्ते घेण्यासाठी गेलो असतो तर आम्ही फोटो कशाला काढले असते असा सवाल श्री शैलेश परब यांनी आज येथे उपस्थित केला.
दरम्यान अक्षय राणें हा व्यक्ती कोण..? मुंबईतून तो त्या ठिकाणी का येतो असा सवाल देखील श्री. परब यांनी यावेळी उपस्थित केला असून निलेश राणें यांना आता पराभव डोळ्यासमोर दिसू लागल्याने बडबड करू लागले आहे असा टोला देखील त्यांनी यावेळी हाणला दरम्यान जर निलेश राणे यांनी आरोप सिद्ध करून दाखवले तर आम्ही राजकारणातून निवृत्ती घेऊन असे ते यावेळी बोलताना म्हणाले. ते सावंतवाडीत शिवसेने शाखेत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
