घावनळे (खुटवळवाडी) येथे विहिरीत पडलेल्या गव्याची वनविभागाकडून यशस्वी सुटका..!

कुडाळ (प्रतिनिधी)*

आज सकाळी घावनळे (खुटवळवाडी) येथे विहिरीमध्ये वन्यप्राणी गवा विहिरीत पडले.असलेबाबत माहिती मिळाली. त्यानुसार कुडाळ वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.संदीप कुंभार यांचे नेतृत्वाखाली जलद बचाव पथक वन्यप्राणी गवा सुटकेसाठी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जागेवर पाहणी केली असता सदर वन्यप्राणी एकूण दोन गवे त्यापैकी एकाचे अंदाचे 4-5 वर्षे वयाचा नर गवा तसेच दुसरा अंदाजे 2 वर्षे वयाची मादी गवा असल्याचे निदर्शनास आले. विहिरीवर वाढलेल्या वेली चा अंदाज न आल्यामुळे विहिरीत पडले असावेत असे दिसून आले. सदर दोन गवे विहिरीतील पाण्यावर पोहत असल्याचे दिसून आले . सदर वन्यप्राणी गवे सुखरूपरीत्या बाहेर काढण्यासाठी वन विभागाच्या रेस्क्यू टीमने सदर वन्यप्राणी गवे अथक प्रयत्ना नंतर क्रेन च्या सहाय्याने विहिरी मधून बाहेर काढले.अश्या प्रकारे यशस्वीरित्या त्याची नैसर्गिक अधिवासात सुटका करण्यात आली.

वन्यप्राणी गवा हा आपल्या जैवविविधतेतील एक मोठा तृणभक्षी प्राणी असून तो आपल्या जीवसृष्टी तील एक महत्वाचा घटक आहे, म्हणुन या आपल्या कोकणातील ठेव्याचे जतन, संरक्षण व संवर्धन करण्यासाठी आपल्या सर्व सिधुदुर्गवासीयांनी असेच मोलाचे सहकार्य करावे असे आवाहन सावंतवाडी वन विभागामार्फत करण्यात येत आहे.

ही बचाव मोहिम उपवनसंरक्षक सावंतवाडी श्री.एस नवकिशोर रेड्डी व सहायक वनसंरक्षक श्री. सुनील लाड यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल श्री.संदिप कुंभार, नेरूर तर्फ हवेली वन परिमंडळ चे वनपाल श्री. दिनेश टिपूगडे,नेरूर तर्फ हवेली नियतक्षेत्राचे वनरक्षक श्री सचिन पाटील ,वनरक्षक श्री. बदाम राठोड , श्री शिवाजी पाटील , श्री. किरण गोसावी , पशुधन पर्यवेक्षक श्री .कामटेकर वनसेवक श्री. यशवंत कदम, सिंधुदुर्ग वाईल्डलाईफ इमर्जन्सी रेस्क्यू श्री. अनिल गावडे तसेच घावनळे (खुटवळवाडी )गावचे सर्व पदाधिकारी व स्थानिक ग्रामस्थ बांधव यांचे मोलाचे सहकार्याने पार पाडण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page