रत्नागिरी प्रतिनिधी *
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी महायुतीतर्फे युवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा युवा मेळावा सोमवार दिनांक २९ एप्रिल रोजी सकाळी १०:०० वाजता जयेश मंगल पार्क येथे होणार आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी-सिंधुदुर्ग कसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे उमेदवारी जाहीर झाल्यापासून भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट), मनसे, रिपब्लिकन पार्टीऑफ इंडिया (आठवले गट) या महायुतीच्या घटक पक्षांनी एकत्रितपणे अत्यंत जोमाने प्रचाराला सुरवात केली आहे. शहरातील सर्व प्रभाग स्तरावर आणि गावागावांत घरोघरी जाऊन प्रचार सुरू आहे. याच प्रचाराचा एक भाग म्हणून युवा आणि नवमतदारांना संबोधित करण्यासाठी या युवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि विशेषतः नारायण राणे यांच्या अखत्यारीतील एमएसएमई मंत्रालयाने युवकांसाठी आणलेल्या योजना आणि यापुढील प्रस्तावित योजना याविषयी युवकांना संबोधित करण्यात येणार आहे. या मेळाव्यासाठी केंद्रीय मंत्री आणि लोकसभेचे उमेदवार नारायण राणे, राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, या प्रमुख मान्यवरांसह आमदार नीतेश राणे, आमदार शेखर निकम, माजी खासदार नीलेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार बाळ माने, शिवसेना नेते किरण सामंत, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शिवसेना जिल्हाध्यक्ष राहुल पंडित, राष्ट्रवादी काँग्रेस प्रभारी जिल्हाध्यक्ष बंटी वणजु, मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष प्रा. उरुणकर, राष्ट्रवादीचे लोकसभा समन्वयक अजित यशवंतराव आदी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यासाठी युवा वर्गाने अधिकाधिक संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ. ऋषिकेश
फळकर, जिल्हा सरचिटणीस अनिरुद्ध फळणीकर,
युवा सेना जिल्हाप्रमुख केतन शेट्ये, मनविसे आदी उपस्थित होते