भाजप युवा नेते विशाल परब यांचे ग्रामस्थांना आश्वासन.
सावंतवाडी प्रतिनिधी
तालुक्यातील माठेवाडा, झिंरगवाडी येथे श्री ब्राह्मण पाटेकर मंदिराच्या कामकाजासाठी व सुशोभीकरण कामासाठी गावकऱ्यांना मदत करण्याचे आश्वासन भाजप युवा नेते विशाल परब यांनी दिले. याबाबत गावकऱ्यांनी आर्थिक मदतीची मागणी केली होती. या मागणीवर तात्काळ मदत करण्याचे श्री. परब यांनी जाहीर केले.
याप्रसंगी विजय नाईक, बाबल नाईक, नाना नाईक, पांडुरंग नाईक, आबा नाईक, लवू नाईक, अरुण नाईक, उमेश नाईक, अशोक नाईक, युवक शहर अध्यक्ष संजय टेमकर व महिला भगिनी उपस्थित होत्या.