कुडाळ प्रतिनिधी
हुमरमळा वालावल गावात खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून विकास कामे शंभर टक्के झाली असुन शिवसेना उमेदवार खासदार विनायक राऊत यांना ९० टक्के मताधिक्य देण्याचा हुमरमळा वासिंयांनी निर्धार केला!
आज शिवसेना उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ शुभारंभ श्री देव रामेश्वर चरणीं श्रीफळ ठेऊन शुभारंभ मुख्य गावकर महेश परब, सरपंच श्री अमृत देसाई, यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला,
यावेळी ग्रामस्थांनी खासदार विनायक राऊत यांनी मंजुर करुन मोबाईल टॉवर ची गैरसोय दुर केली असुन सध्या नविन ग्रामपंचायत इमारत सुसज्ज होत आहे ती सुध्दा खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक यांनी दीलेल्या निधीमुळे, सध्या हुमरमळा देसाई वाडा पुलाचे काम,बिजोळे वाडी रस्ता,बिजोळेवाडी पुल,ही कामे सुरू करण्यात आली असुन आचारसंहिता संपल्यावर प्रा शाळा रामेश्वर विद्या मंदिर नविन इमारत सुरू करण्यात येईल गावात जी कामे आज पर्यंत झाली ती अतुल बंगे, अर्चना बंगे यांच्या मागणिनुसार आणि युवा सेना वालावल पंचायत समिती विभाग प्रमुख श्री मितेश वालावलकर यांच्या सततच्या प्रयत्नाने खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक यांनी मंजुर करुन दीली असुन हुमरमळा वालावल वासियांनी या कामाची पोचपावती म्हणून कायमच खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक यांच्या खंबीर पाठीशी राहीले आहेत, म्हणुनच हुमरमळा वालावल गावातील ९० टक्के मताधिक्य खासदार विनायक राऊत यांना देण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला असुन हुमरमळा वालावल ग्रामपंचायत सरपंच श्री अमृत देसाई, उपसरपंच सौ रश्मी वालावलकर, ग्रामपंचायत सदस्या सौ हेमांगी कंद्रेकर,सौ संजना गुंजकर, श्री मितेश वालावलकर यांच्या नेतृत्वाखाली लोकांची कामे सुरळीत होत असल्याने ग्रामस्थ समाधानी आहेत,
यावेळी शिवसेनेचे अतुल बंगे, माजी सरपंच सौ अर्चना बंगे, शिवसेनेचे प्रकाश परब, नारायण राणे, महेश परब, सतिश मांजरेकर, वैभव मांजरेकर, कुडाळ शिवसेना महीला उपशहरप्रमुख सौ दुर्वा गवाणकर, शाखाप्रमुख रमेश परब, युवा सेना शाखाप्रमुख संदेश जाधव,मा उपसरपंच श्री स्नेहल सामंत,मा ग्रामपंचायत सदस्य भिवा गुंजकर,भाऊ गुंजकर, मयुर प्रभु, संदीप प्रभु,सौ रमा गाळवणकर,सौ संजना गुंजकर, श्री दीपक चव्हाण,निखिता वालावलकर, रश्मी रमेश परब,हेमलता परब,राजन कंद्रेकर, हेमंत कंद्रेकर आदी उपस्थित होते