आम.रविंद्र धंगेकरांसह ३५ ते ४० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल:तक्रार करूनही पोलीस कारवाई करत नसल्याचे ठिय्या आंदोलन‌…

पुणे प्रतिनिधी
मतदानाच्या एक दिवस अगोदर रविवारी (१२ मे)
धंगेकर यांनी सहकारनगर पोलीस स्टेशनसमोर आंदोलन केले होते. सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला होता. तक्रार करूनही पोलीस कारवाई करत नसल्याचे सांगत सहकारनगर पोलीस ठाण्यातच त्यांनी ठिय्या आंदोलन केले होते. आता त्या आंदोलनामुळे धंगेकर अडचणीत सापडले आहेत. या आंदोलनामुळे त्यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कलम १४३, १४५, १४९, १८८ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम १३५, लोकप्रतिनीधी अधिनियम १९५१ चे कलम १२६ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले.

जमावबंदीचे उल्लंघन करत आंदोलन केल्याप्रकरणी कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह ४० ते ५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जोपर्यंत पोलीस पैसे वाटप करणाऱ्यांवर कारवाई करत नाहीत तोपर्यंत पोलीस ठाण्यातून उठणार नाही असा आक्रमक पवित्रा धंगेकरांनी घेतला होता.

भाजपवर आरोप करताना धंगेकर म्हणाले होते, BJP कडून घराघरात पैसे वाटले जात आहेत. मी रात्रभर इथेच बसून राहणार आहे. तुम्ही काही करत नाही. ते रात्रभर पैसे वाटून मोकळे होतील. तो निवडणूक आयोगाचा माणूस कुठंय? इथं लोकशाहीत असं घडतंय. तुमचा माणूस कुठंय? हा तिकडं पैसे वाटले जात असताना तुमचा एकही माणूस नाही. मी इथून उठणार नाही. तुम्ही तातडीने कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page