कुडाळ शहरात माकडांच्या वाढलेल्या उपद्रवासंदर्भात (उबाठा) शिवसेनेच्या वतीने वनविभागाला‌ निवेदन

कुडाळ शहरातील सततच्या वाढत्या माकडाच्या उपद्रवामुळे मोठ्या प्रमाणात भात शेती, केळी नारळांचे नुकसान झाले. यासंदर्भात उबाठा शिवसेनेच्या वतीने कुडाळ वन क्षेत्रपाल श्री.सावंत यांच्याशी भेट घेत चर्चा करण्यात आली
शहरात सांगेर्डेवाडी, कुंभारवाडी,केळबाई वाडी व कवीलकट्टे भागात ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात माकड वावरत आहेत त्या ठिकाणी तात्काळ माकड पकडण्याचे पिंजरे लावण्यात यावे अशी मागणी करण्यात आली
त्याच प्रकारे कुडाळ शहरातील माकडामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरपाई तात्काळ करून द्यावी अशी देखील आग्रही मागणी करण्यात आली
या मागणीला वनक्षेत्रपाल कुडाळ सावंत यांनी समाधानकारक उत्तर देऊन तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिला
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, संदीप महाडेश्वर, अमित राणे, बाळा वेंगुर्लेकर, गुरुनाथ गडकर, रोहन शिरसाट, सुरेंद्र तेली, नागेश जळवी, दिनार शिरसाट, आपा राणे, प्रथमेश राणे, सुशील चिंदरकर, नितीन सावंत, संजय मसुरकर,प्रथमेश राणे, विशाल राणे व सांगडेवाडी येथील शेतकरी उपस्थित होते आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page