उद्या सावंतवाडीत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण होणार दाखल…

भारतीय जनता पार्टी व शिंदे शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वादानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण काय बोलणार याकडे सर्वांचा लक्ष?

सावंतवाडी प्रतिनिधी
महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे सावंतवाडी येथे उद्या दाखल होत आहेत. भारतीय जनता पार्टी व युवा नेते विशाल परब यांच्या शिरोडा नाका, सावंतवाडी येथील कार्यालयात ते सकाळी साडेनऊ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत, असे भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी कळविले आहे.

सावंतवाडी ते नुकत्याच झालेल्या भारतीय जनता पार्टी व शिंदे शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वादानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सावंतवाडी येत आहे या दौऱ्याकडे व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page