महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते शनिवारी होणार उद्घाटन..
सावंतवाडी (प्रतिनिधी)येथील महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते शनिवारी सकाळी नऊ वाजता होणार आहे. या कार्यक्रमासाठी महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संजू परब यांनी केले आहे. सावंतवाडी शहरात संजू परब यांच्या कार्यालयाच्या बाजूला होऊ घातलेल्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे प्रचार कार्यालय उघडण्यात आले आहे. शनिवारी…
