कुडाळ प्रतिनिधी
जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे आपण रुग्णाच्या सेवेत परमेश्वराची सेवा मानून काम करतो तशीच सेवा भविष्यातही केली जाईल असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते संजय करलकर यांनी कवठी येथे केले आरोग्य शिबिराचा ५९ ग्रामस्थांनी लाभ घेतला
मागीलवर्षी कवठी गावातील ग्रामस्थांची, काही अती दुर्मिळ रुग्णसाहित्य घेऊन होणारी अडचण शिवसेनेच्या वतीने दूर करण्यात आली होती , त्या वस्तूंचा चांगल्या प्रकारे उपयोग सुध्दा गावातील लोकांनी केला, आज तशाच प्रकारे ज्या समाजात आपण वावरतो, त्या समाजाचं आपण काही देणं लागतो या भावनेतून, आपल्या गावातील लोकांची आपल्या कडून काहीतरी सेवा व्हावी या हेतूने, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) कवठी शाखेच्या वतीने नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी तसेच मोफत औषधोपचार शिबिर संजय करलकर यांच्या घरी व डॉ सौ.राणे यांच्या दवाखान्यात आयोजित करण्यात आले होते, या शिबिराचा गावातील सुमारे ५९ ग्रामस्थांनी लाभ घेतला, या शिबिरात नेत्र तपासणीसाठी
.नेत्रचिकित्सक अधिकारी सौरभ बालम अक्षय नाईक(ओरोस)जिल्हा समन्वयक (ओरोस) प्रशांत जाधव.सौ. सुप्रिया बाणे.सौ. योगिता राणे सावंत आदी उपस्थित होत्या. या कार्यक्रमास गावातील शिवसेनेचे पदाधिकारी उपविभागप्रमुख श्री. मंगेश बांदेकर,महिला उपविभाग प्रमुख सौ. संचीता फडके,युवासेना उपविभागप्रमुख श्री. रुपेश खडपकर, शाखाप्रमुख श्री. गोपाळ कवठकर, उपसरपंच सौ. ऋतुजा खडपकर, माजी सरपंच श्री.रुपेश वाडयेकर, श्री. संजय करलकर, श्री. अरुण परुळेकर, श्री. दिलीप परुळेकर, श्री.संतोष वाडयेकर, श्री. रमेश परुळेकर, श्री. गजानन कवठकर, श्री. राजन खोबरेकर, श्री. अथर्व खोबरेकर, श्री. महेश वाडयेकर, श्री. सिद्धेश कवठकर, श्री.सुजय करलकर, श्री. सिध्दीविनायक कवठकर, श्री. प्रवीण वाडयेकर, श्री. दीपक सांगळे, कु. हरियाली खोबरेकर, कु. समीक्षा फडके आदी उपस्थित होत्या
शिवसेना (उ.बा.ठा) कवठी शाखेच्या वतीने नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…
