कुडाळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने आयोजन.!
माणगाव प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष यांना माणगाव त्रिमूर्ती सभागृह येथे सर्वपक्षीय वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी, एम के गावडे, मोहन सावंत, प्रकाश मोर्ये, दीपक नारकर, काका कुडाळकर, संदीप राणे, आर के सावंत, सगुण धुरी, श्री. धुरी सर, डॉ पाटील, पांडू सावंत, रमाकांत तामणेकर, रुपेश कानडे, योगेश धुरी, सचिन धुरी, राजा धुरी, अजित परब, श्री. साटम, कोराणे सर, अशोक सावंत, आदी सर्व पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
यावेळी स्वर्गीय अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली उपस्थितांनी अजित दादा पवार यांचे कार्य तसेच त्यांच्या आठवणींना उजाळा दिला सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी झटणारे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याने महाराष्ट्र आज पोरका झाला आहे.या कार्यक्रमाचे कुडाळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने आयोजन करण्यात आले होते
