आज शिवसेना कुडाळ तालुका कार्यालय येथे शिवसेना पक्षाची बैठक संपन्न…..

भारतीय जनता पक्षाकडून शिवसेना पक्षातील पदाधिकारी यांना विश्वासात घेत नसल्याबाबत व्यक्त केली खंत……

कुडाळ (प्रतिनिधी)
आज शिवसेना कुडाळ तालुका कार्यालय येथे शिवसेना पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक संपन्न झाली. याबैठकीत शिवसेना पक्षातील पदाधिकारी यांना जिल्हा नियोजन समितीमधून शिवसेना पक्षाला १०% निधी दिला जाईल असा शब्द सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पालकमंत्री मा.ना.श्री. रविंद्रजी चव्हाण साहेब यांनी शब्द दिल्याप्रमाणे शब्द पाळला नाही.त्याचप्रमाणे विविध समितीवर शिवसेना पक्षातील पदाधिकारी यांच्यावर सतत अन्याय होत असल्याबाबतची भावना शिवसेना पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी व्यक्त केली.भविष्यात अन्याय होणार नाही याची शाश्वती काय ? फॉर्म भरण्याच्या कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत अद्याप पर्यंत वरिष्ठ स्तरावरून कोणत्याही प्रकारची सूचना नाही.आम्हाला आमचे नेते श्री.किरण उर्फ भैय्या सामंत यांनी आदेश दिल्याशिवाय कोणत्याही प्रकारे काम करणार नाही असा एल्गार शिवसेना पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मांडला त्याचप्रमाणे आमचे नेते श्री.किरण उर्फ भैय्या सामंत यांनी मोठ्या मनाने माघार घेतल्याबद्दल शिवसेना पक्षातील पदाधिकारी यांनी कौतुक केले.यावेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख श्रीम. वर्षाताई कुडाळकर,शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर,शिवसेना तालुकाप्रमुख श्री.अरविंद करलकर,युवासेना तालुकाप्रमुख श्री.प्रसाद नार्वेकर,शिवसेना तालुका संघटक श्री. अनिकेत तेंडुलकर,शिवसेना उपतालुका संघटक श्री.संजय सावंत,शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख सौ.दीक्षा सावंत,शिवसेना महिला आघाडी उपतालुकाप्रमुख सौ.अनघा रांगणेकर,महिला आघाडी उपविभागप्रमुख कु.शिल्पा आचरेकर,शिवसेना प्रवक्ते श्री.रत्नाकर जोशी, उपतालुकाप्रमुख श्री.पंढरीनाथ गुरव,विभागप्रमुख श्री. जयदीप तुळसकर,श्री.चंद्रकांत राणे,श्री.प्रवीण मर्गज,श्री.पांडुरंग राणे,श्री.राजेश तेंडुलकर,श्री.महेंद्र सातार्डेकर,श्री.राजेश तेंडुलकर,श्री.किशोर सावंत,श्री.विठोबा शेडगे,उपविभागप्रमुख श्री.रामकृष्ण गडकरी, श्री.अंकित नार्वेकर, श्री.विठ्ठल शिंदे, श्री.पुंडलिक जोशी,श्री.रामचंद्र परब,श्री.आदित्य राणे,श्री.दर्शन इब्रामपुरकर,श्री.सीताराम कदम,रुपेश नाईक, बुथप्रमुख,शिवदूत उपास्थित होते.यावेळी नाराजीचा सुर कार्यकर्त्यांनी आळवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page