स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव होत असताना घराकडे जाण्यासाठी साधा रस्ता नाही
कुडाळ प्रतिनिधी
तालुक्यातील माणगाव गावांमधील मेन रोड ते कट्टावाडी वेताळटेम हा रस्ता ग्रामपंचायत दप्तरी लोन असून सुद्धा गेली कित्येक वर्ष अस्तित्वात नाही या अगोदर या रस्त्यावर 2007 साली निधीही खर्च झाला आहे परंतु अतिक्रमण करून हा रस्ता नष्ट केला गेला असेल तिथल्या रहिवाशांचे म्हणणे आहे याच पार्श्वभूमीवर गेले कित्येक वर्ष रस्त्यापासून वंचित राहणाऱ्या या वाडीने येत्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय एक मुखाने घेतला आहे जोपर्यंत आमच्या वाढीचा रस्ता होत नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याही निवडणुकीत मतदान करणार नाही अशी ठोस भूमिका या ग्रामस्थांनी घेतली आहे वृद्ध आजारी महिला लहान मुलांना ने हान करताना अनेक याचना भोगावे लागतात स्वातंत्र्याची 75 वर्षे होऊ नये या वाडीला रस्ता नसल्याने अतिशय हा हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहे यामुळे आक्रमक झालेल्या महिलांनी हा एकमतांनी निर्णय घेतला आहे.